न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- पोस्टातील विविध तंत्रज्ञान आणि सेवांची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व पोस्ट कार्यालयांत मेळाव्याचे सोमवारी (दि. १) रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्यात शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना पोस्टाबद्दल माहिती सांगण्यात येणार आहे.
कोअर बँकिंग सोल्युशन, कोअर इन्शुरन्स सर्व्हिस, कोअर सिस्टिम इंटिग्रेशन, आधार नोंदणी, इंडिया पोस्ट पेमेंट्स व अद्ययावत सेवा याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. त्यानुसार चिंचवड येथील मुख्य कार्यालय तसेच, पिंपरी, हडपसर, दिघी, येरवडा आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे शहराच्या पूर्व विभागाच्या अधीक्षकांनी दिली आहे.


















