न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी :- रहाटणी- काळेवाडी परिसरात जागोजागी उभारण्यात येणाऱ्या बेकायदेशीर व अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यात त्यांनी या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्सचे पेव फुटले असून त्यास तात्काळ प्रतिबंध करणे गरजेचे आहे, जेणेकरून कालच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.
तसेच शहरात अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले वाढदिवस व उपक्रमांची माहिती देण्याकरीता अनधिकृत फ्लेक्सबाजी केली असून ते फ्लेक्स तात्काळ हटवावेत अन्यथा होर्डिंग्स पडून काही अनुचित घटना घडली तर त्यास महापालिका जबाबदार असेल असे, दाखले यांनी निवेदनात नमूद केले आहे.










