न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रतीनियुक्तीवरील अ. मा. भालकर, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य यांना पिंपरी मनपामध्ये रुजू करुन न घेऊ नये, याबाबत नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन आदेश क्रमांक पीओजी १२१७ / प्र. क. १६६ / सेवा दिनांक ८ जून २०१९ अन्वये श्री. अ. मा. भालकर कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांची या पदावरुन अधीक्षक अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांच्या आस्थापनेवरील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) या रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आलेली आहे.
वस्तुतः नगरविकास विभागाातील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २००४ / ४७३ / प्र क्र. ८५ / नवि – २० दिनांक ७ जुन २०१४ च्या परिपत्रकान्वये महापालिका आयुक्तांना राज्य शासनाकडील अधिकारी कर्मचारी यांची आवश्यकता असल्यास तशी मागणी त्यांनी नगरविकास विभागाकडे नोंदविणे आवश्यक आहे. तसेच अन्य मंत्रालयीन विभागांनीही त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्त्या महानगरपालिकेच्या आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने करताना नगरविकास विभागाची पूर्वसंमती मिळवणे आवश्यक आहे. नगरविकास विभागाच्या पूर्वसंमतीशिवाय प्रतिनियुक्तीने नेमणुक करू नये, असे स्पष्ट आदेश या परिपत्रकात दिलेल आहेत.
श्री. अ. मा. भालकर यांना नगरविकास विभागाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रुजू होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आदेश नाहीत, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश आहेत. त्यामुळे सदरचा आदेश बेकायदेशीर आहे. त्यामुळे श्री. अ. मा. भालकर यांना पि. चि. मनपामध्ये नियुक्ती देणे नियमबाह्य होईल. त्यामुळे भालकर यांना नियुक्ती देणे नियमबाह्य कृती होईल. तरी आपणास विनंती आहे की, श्री. अ. मा. भालकर अधिक्षक अभियंता यांना पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नियमबाह्य नियुक्ती देण्यात येऊ नये, तसेच महाराष्ट्र शासनाचे नियम व आदेश डावलून श्री. अ. मा. भालकर यांना नियुक्ती दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध राहिल. याबाबत आपणांविरुध्द न्यायालयात याबाबत दाद मागितली जाईल, असे या पत्रात भोंडवे यांनी म्हटले आहे.
या पत्रावर नगरसेवक राजू मिसाळ, शाम लांडे, जावेद रमजान शेख, नवनाथ जगताप, प्रज्ञा खानोलकर, पंकज भालेकर आदींच्या सह्या आहेत.











