न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- पिंपळेनिलख येथील भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
महापौर राहूल जाधव यांच्याकडे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव या पदाचा जबाबदारीस पूर्णपणे न्याय देणे शक्य नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिका सदस्यपदाची जबाबदारी निष्ठेने सांभाळली आहे. शहर हरित होण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. मात्र या पदाला न्याय आणि वेळ देता येत नाही, त्यामुळे राजीनामा दिला आहे. महापौरांनी राजीनामा स्वीकारला आहे. सत्तारूढ पक्षनेत्यांनी हा राजीनामा स्विकारलेला नाही.











