न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- मोशी परिसरात देहू रस्ता ते प्रेस्टीन ग्रीन सोसायटी, सिल्वर नाईन,स्वराज कॅपीटल, स्वराज सोसायटी, स्वराज रेसीडेन्सी यासोबतच इतर सोसायट्यांमधील नागरिकांच्या पाणी, वीज, रस्ते यांच्या समस्या रखडल्या होत्या. मात्र आमदार महेश लांडगे यांनी चौकशी करून अवघ्या चोवीस तासांत कामाचे आदेश देऊन परिसरातील रस्त्यांचे काम पूर्ण करून घेतले. यासोबतच इतर समस्यांही मार्गी लावल्या. आमदारांच्या कामातील तत्परतेमुळे परिसरातील आणि बारणेवस्तीमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मागील चार दिवसांपूर्वी आमदार महेश लांडगे यांनी जाधववाडी, चिखलीसोबतच मोशीतील काही सोसायट्यांमध्ये दौरा करून समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानुसार मोशी परिसरातील सोसायट्यांध्ये रस्ते, पाणी यांच्या समस्या होत्या. त्यामध्ये रस्त्यांच्या कामाचे तत्काळ आदेश देऊन देहू रस्ता ते मोशी, बारणेवस्तीमधील सोसायट्यांच्या रस्त्यांचे काम अवघ्या चोवीस तासांत पूर्ण केले. या रस्त्यांच्या कामाचा श्रीगणेशा मंगळवारी (दि. २) रोजी महापौर राहूल जाधव, उद्योजक कार्तिक लांडगे, नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेविका आश्विनी जाधव, बांधकाम व्यावसायिक संतोष बारणे, उद्योजक शिवाजी बारणे, सामाजिक कार्य़कर्ते संतोष जाधव यावेळी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे यांच्याशी रस्त्यांच्या कामाबद्दल चर्चा केल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत रस्त्यांचे काम पूर्ण करून दिले. तसेच सोसायट्यामधील इतर समस्यां मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यांच्या या कामातील तत्परतेमुळे आमच्या समस्या मार्गी लागल्या असल्याचे बांधकाम व्यावसायिक संतोष बारणे यांनी सांगितले.











