न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- राहुल चिंचवड एमआयडीसीमधील फोरबेस कंपनीमध्ये नोकरी करतात. ३१ मे रोजी एका अज्ञाताने त्यांच्या कंपनीचा मेल आयडी हॅक केला. त्यातून कंपनीच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्याद्वारे त्याने कंपनीच्या बँक खात्यातून ५ लाख २२ हजार १७३ रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्स्फर करून घेतले.
हा प्रकार कंपनीच्या लक्षात येताच कंपनीने झालेला व्यवहार फ्रीझ केला. त्यामुळे दुस-या खात्यावर गेलेले पैसे कंपनीच्या खात्यावर पुन्हा आले. याबाबत राहुल सुभाष खिरे (वय ४२, रा. आदर्शनगर, सातारा रोड, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


















