न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली :- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबर, मिझोराम आणि मध्यप्रदेश २८ नोव्हेंबर, छत्तीसगड आणि तेलंगणा ७ डिसेंबर मतदान घेण्यात येणार आहे. तर या निवडणुकांचे निकाल ११ डिसेंबरला जाहीर होणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज (शनिवार) दिली.











