न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर ‘साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव २०१९-२०’ या समितीच्या अध्यक्षपदी सतिष भवाळ यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड एक वर्षांसाठी असणार आहे.
या प्रसंगी नवनिर्वाचित समिती अध्यक्ष भवाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक तुषार हिंगे, मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, आण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे संचालक मनोज तोरडमल, युवराज दाखले, सुरेश जोगदंड, नाना कसबे, सुनिल भिसे, संदिप जाधव, दशरथ सगट, विठ्ठल खलसे, नितीन घोलप, अरूण जोगदंड, संजय ससाने, भगवान शिंदे, नितीन घोलप, कांतीलाल शिंदे आदी पमुख पदाधिकारी उपस्थित होते.











