न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रूग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने संत तुकाराम नगर येथे स्वस्थवृत्त व योग विभागात सोमवार (दि. ८ ते २० जुलै) या कालावधीत मधुमेह (डायबीटीज) रूग्णांसाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ओ. पी. डी. क्रमांक ७ या ठीकाणी ही तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबीरात २५ ते ६० वर्षे वयोगटातील मधुमेह असणा-या व्यक्तींवर मोफत उपचार करण्यात येतील. उपचारांमध्ये औषधे मोफत देण्यात येतील, तसेच प्रयोगशालीन तपासणी मोफत करण्यात येईल. ओपीडी क्रमांक ७ या ठिकाणी सर्व आजारांवर मोफत योग व आहार मार्गदर्शन करण्यात येईल.
या शिबीरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९८९०३५५३०५, ९८३०७६९९३८, ९५१८७४८३४१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय स्वस्थवृत्त योग विभागाच्या प्रमुख डॉ. मेधा कुलकर्णी, प्राचार्य डॉ. गुणवंत येवला यांनी केले आहे.


















