न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- निगडीतील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा परिसर व पुर्णाकृती पुतळ्याची दुरूस्ती तात्काळ करण्याचे प्रशासनास आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेना व शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या कार्यक्षेञात निगडी या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याची निगा राखली जात नसल्याचे दिसुन येत असुन, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
साहेब १८ जुलै २०१९ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतीथी आहे. या पुण्यतीथीला संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातुन मातंग समाजाबरोबर बहुजन समाज मोठ्या संखेने उपस्थित राहणार असुन, आपण तात्काळ गंभीर दखल घेऊन, दुरूस्तीचे आदेश द्यावेत, असे या पत्रात त्यांनी म्हटले आहे.















