न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- खासगी शिकवणीसाठी मळवली रेल्वे स्थानकातील रेल्वे रूळ ओलांडून जात असताना १३ वर्षीय मुलाचा आणि सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना मळवली रेल्वे स्थानकात शुक्रवार (दि. ६) रोजी पावणेचारच्या सुमारास घडली.
मावळ आणि लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे त्या मुलाने पावसापासून बचाव व्हावा यासाठी छत्री घेतली होती, तो रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे पाहून सतीश याने त्याला हाक मारली आणि त्याच्या छत्रीचा आसरा घेतला.
दोघे ही एकत्र रेल्वे रूळ ओलांडून जात होते. तेव्हा, भरधाव वेगात असणाऱ्या पुणे-इंदूर या एक्सप्रेस ने दोघांना जोरात धडक दिली यात दोघांचा ही मृत्यू झाला आहे. महेंद्र चौधरी (वय- १३ रा. मळवली) मूळ राजस्थान, सतीश शिवराम हुलवळे (वय- ३२ रा. कार्ला) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.















