न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात पावसाचा जोर वाढू लागला असून, महापालिकेच्या वतीने पूरनियंत्रणासाठी कंट्रोल रूम तयार केली असून स्थापत्य, आरोग्य, अग्निशमन विभाग सज्ज केला आहे. पूरातील बाधित आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या नदीकाठच्या परिसरात सर्तकतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड परिसरातून पवना, इंद्रायणी आणि मूळा या नद्या वाहतात. संततधार सुरू असल्याने महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थानाची यंत्रणा सज्ज केली आहे. त्यासाठी असणारी कंट्रोलरूम सज्ज केली आहे. तसेच क्षेत्रीय अधिकारी आपत्तीव्यवस्थापनाचे महत्वाचे क्रमांकही प्रसिद्ध केले आहेत. पावसाच्या कालखंडात आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन प्रमुख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द केल्या आहेत.
तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कार्यकारी अभियंता, सहायक आरोग्य अधिकारी, प्रशासन अधिकारी आरोग्य अधिकारी यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. महापालिका भवनाशिवाय क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष हा चोविस तास कार्यरत ठेवावा, अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिल्या आहेत.















