न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेकायदेशीररित्या पिस्तुल विक्रिसाठी आलेल्या कुविख्यात गुन्हेगाराला सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. ५) रोजी दिघी रोड येथे करण्यात आली.
गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (वय ३२, रा. नारायण रसाळवाडा, भोसरी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.















