न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- त्याने अनोळखी मुलीशी ओळख वाढवून मैत्री केली. त्यांनतर प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर लग्नाचे वचन देऊन तिच्यावर बलात्कार केला. शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मुलगी गरोदर राहिली.
गेल्या काही महिन्यांपासून मुलगी कामासाठी बाहेर जात असे. सायंकाळी कामावरून घरी येत असताना गोविंद गार्डन येथील पुलाजवळ एका अनोळखी मुलाने तिच्याशी ओळख केली. त्यानंतर हा प्रकार घडला.पीडित १६ वर्षीय मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात त्या मुलाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















