न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- चिंचवड येथील ग्रीव्हज कॉटन कंपनीच्या आयटी विभागातुन अनोळखी चोरांनी सहा लाख रुपये किमतीचे डेल कंपनीचे १२ लॅपटॉप चोरून नेले.
हा प्रकार शनिवारी (दि. ६ ते ८ जुलै) या दरम्यान चिंचवड येथे घडला आहे. कंपनीचे गिरीश उपेंद्र क-हाडे (३८, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार त्या चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















