न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- पिंपरीतील यशवंतनगर येथे रविवारी (दि. ७) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव चारचाकी मोटारीच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारीच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अर्जून ज्ञानदेव किरदकरवे (वय ६५, रा. यशवंतनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवराम अर्जून किरदकरवे (वय २४, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


















