न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०१९) :- आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजच्या वतीने ‘डॉक्टर दिनानिमित्ताने डॉक्टरांचा सत्कार करून डॉक्टर दिन साजरा केला. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असतो. रूग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत असणार्या डॉक्टरांबद्दल कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यासाठी आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये नुकताच अभिनव उपक्रम राबवला.
सत्कारामध्ये डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ रोहन काटे, डॉ. सतीश कोळेकर, डॉ अनुप पाचंगे, डॉ विशाल क्षिरसागर या डॉक्टरांचा समावेश आहे. तसेच यावेळी औषधनिर्माण शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या १५ विद्यार्थ्यांचा गौरव केला. प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ सुधीर पंड्या, प्रियतमा पोवार, सारिका निकम व विद्यार्थी वृंदानी, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड येथील डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सलोनी कडू, अमित जाधव, प्रणव शेवकर, चैत्राली कोळी, रोहित कटारिया, आकांक्षा घाटगे, भाग्यश्री बेहेरा, अर्पिता वेल्लोरे, जय तातिया, प्रवीण झुरे, प्राची कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.















