न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० जुलै २०१९) :- आजचे माहिती-तंत्रज्ञानाचे युग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आजच्या तरुणाईला विविध संधी खुणावत आहेत. असाच अभिनव उपक्रम आयडिया लॅबच्या रुपाने सुरु होत आहे.
एस. एम. जोशी कॉलेज आणि ट्रान्सफीनाइट इनोव्हेटिव्ह सोलूशन्स प्रा. ली. यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. सदर कंपनीने आय लॅब हे ऍप विकसित केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना व कल्पनांना त्याद्वारे राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळणार आहे. त्यातून त्यांना पेटंटही मिळू शकते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दि.१२/०७/२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता महाविद्यालयात होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक डॉ. भारत काळे तर अध्यक्ष म्हणून वैज्ञानिक डॉ. उल्हास खरूल उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच डॉ.ए.बी. आडे , डॉ.मिलिंद कुलकर्णी , सतीश जावळे , दीपक वाणी, आशुतोष कुलकर्णी, अशोक तुपे,चेतन तुपे,दिलीप तुपे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी दिली.











