न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०१९) :- स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या मागणीची दखल घेत, पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली भागातील कुदळवाडी, मोई फाटा ते पवारवस्ती उड्डाणपुल तसेच माशी ते शेलारवस्ती रस्ता दुभाजकावर वृक्षांची लागवड करण्यास आज बुधवार (दि. १०) रोजी पासून सुरुवात केली आहे.
महापालिकेने लावलेल्या झाडांपैकी काही झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. याबाबत स्वी. नगरसेवक यादव यांनी आयुक्तांना निवेदन दिले होते. सध्या पावसाळा सुरु असल्याने मनपाने लावलेल्या झाडांपैकी जी झाडे जळून गेली आहेत. त्यठिकाणी पून्हा वृक्ष लागवड करावी, अशी मागणीही केली होती.











