न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०१९) :- निगडी येथील दि इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ७० वा सनदी लेखापाल (सीए) सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.
मोफत आरोग्य तपासणी तसेच यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७० जणांनी रक्तदान केले. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान या विषयावर पथनाट्य सादर केले. बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेक केसकर, अमोल सूर्यवंशी, तर कॅरम स्पर्धेत ऋषभ सिंघवी प्रसाद येडके यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
बक्षीस वितरण प्रसंगी आयकर विभागाचे मुख्य आयुक्त एस. एस. राणा, अतिरिक्त आयकर आयुक्त असीम शर्मा, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए संतोष संचेती, उपाध्यक्षा सीए सिमरन लिलवानी, सचिव सीए पंकज पाटणी, खजिनदार सीए सचिन बन्सल, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए विजयकुमार बामणे, सीए चंद्रकांत काळे, सीए शैलेश बोरे व कार्यकारी सदस्य आदी उपस्थित होते.


















