न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०१९) :- दुचाकीला लाथ मारून खाली पाडल्याचा जाब विचारल्याने चक्क एकाने कानाला चावा घेत तुकडा पाडल्याची गंभीर घटना निगडीत घडली आहे. याप्रकरणी जखमी कौतुभ गोळे यांनी निगडी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी आरोपी अभिजित गुंजाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादींची इमारतीतमध्ये पार्क केलेल्या दुचाकीला अभिजीतने लाथ मारली होती. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून चावा घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


















