न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०१९) :- एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून चारचाकी मोटारसह २ पिस्टल, ३ जिवंत राऊंड, कोयता, स्टील रॉड हस्तगत करण्यात आला. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. सर्व आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुर्गेश बापु शिंदे (वय ३२, रा. वाकड, मुळगाव श्रीरामपूर, जि. अहमदनगर), प्रमोद संजय सवने (वय २९, रा. वाकड), भैय्या उर्फ सचिन बबन जानकर (वय २६, रा. वाकड), नाना उर्फ सचिन रामचंद्र शिंदे (वय ३२, रा. वाकड), रामकृष्ण सोमनाथ सानप (वय ३०, रा. वाकड, मुळगाव रामेश्वर वस्ती, ता. भुम, जि. उस्मानाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावरील एटीएमवर दरोडा टाकणार असल्याची व त्यांच्याकडे पिस्टल व कोयत्यासारखी घातक हत्यारे असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.












