न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभापती विलास मडिगेरी यांना महामेट्रोच्या बाऊंन्सर’नी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच उद्या सकाळची पहाटही पाहणार नसल्याचा दम दिला. याचे महापालिकेत पडसाद उमटले असून, त्या बाऊंन्सर’विरोधात मडिगेरी यांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात महामेट्रोचे काम सुरु आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयासमोरील अहल्यादेवी होळकर चौकतही महामेट्रोचे इतर कामे सुरु आहेत. ही कामे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिवसा न करता रात्री केले जात आहेत. त्यासाठी रस्त्याच्या समोर बॅरीकेड्स लावून, रहदारीस रस्ता ओलांडण्यास मज्जाव केला जातो. मात्र, ही कामे कोणतेही सूचना फलक न लावता महामेट्रोच्या वतीने केली जात आहेत.
मंगळवार (दि. १० जुलै) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास महापालिकेचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी कामानिमित्त महापालिकेच्या आवारात आले होते. तसेच महापालिका भवनाजवळील अहल्यादेवी होळकर चौकातून महापालिकेत जात होते. त्या ठिकाणी मेट्रोचे काम चालू होते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी मडिगेरी यांना वाहन पुढे नेण्यास मज्जाव करीत त्यांच्याबरोबर वाद घातला. बाचाबाची सुरु असल्याची माहिती मिळताच महामेट्रोचे ‘बाऊंसर’ तिथे दाखल झाले. त्यांना ही बाब समाजवून सांगणण्याचा प्रयत्न करणा-या मडिगेरी यांना या ‘बाऊंन्सर’नी ‘मला माहित आहे, तू स्थायी समिती सभापती आहेस, फ्लेक्सवर फोटो पाहतो. इथून तत्काळ निघून जा, नाही. तर, तू उद्याची सकाळ पाहणार नाहीस’, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे मडिगेरी यांनी सांगितले.
मडिगेरी यांनी तत्काळ महापालिका, मेट्रो अधिका-यांबरोबरच पोलीस आयुक्तांना फोन लावून परिस्थितीची माहिती दिली. महामेट्रो प्रशासन जोपर्यंत दिलगिरी व्यक्त करत नाही, तोपर्यंत त्यांचे काम बंद करण्यात यावे, अशी मागणी मडिगेरी यांनी आयुक्तांकडे केली आहे.












