न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०१९) :- संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारींच्या विरोधात सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज बुधवार (दि. १०) रोजी पाहणी दौरा केला. यावेळी नगरसेविका सुजाता पलांडे, सुलक्षणा शिलवंत-धर, डॉ. वाबळे आदी उपस्थित होते.
रुग्णालयातील स्वच्छता, औषधांची कमतरता, विविध कामासंदर्भात आढावा बैठक त्यांनी घेतली. तसेच सर्व विभागांची पाहणीही त्यांनी यावेळी केली. पूर्वीपेक्षा सध्या रुग्णालयाची परिस्थिती बदलत आहे. मात्र, रुग्णांना अधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी सबंधीतांना सूचनाही केल्या.












