न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- बारामती लोकसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभेतुन भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उमेदवाराचे नेटाने काम केले. या मतदारसंघातून त्या उमेदवारास आम्ही जवळपास ६५००० हजारांपेक्षा अधिक मतदान मिळवून दिले. मोठे मताधिक्क्य मिळवून देण्यासाठी सर्वांनीच या मतदारसंघात मोठे कष्ट घेतले. याची थेट भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दखल घेतली आहे.
याबाबत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विधानसभा विस्तारक विशाल वाळुंजकर यांना अमित शहा यांनी पत्र पाठविले असून, या मतदारसंघातून उमेदवाराला चांगली मते मिळवून दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन शहा यांनी केले आहे.

याबाबत बोलताना वाळुंजकर यांनी सांगितले की, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आमच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले असून, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अभिनंदन व शुभेच्छापर पत्र एका सामान्य कार्यकर्त्याला व्यक्तिगतरित्या पाठवून आमच्या कामाची पोचपावतीच जणू काय आम्हाला दिल्याचे समाधान मिळत आहे. आमच्या कष्टात सहभागी आमदार भीमराव तापकीर, विधानसभा अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या कामास मिळालेली ही कौतुकाची थाप असून, त्यामुळे आमच्यात पूर्वीपेक्षा अधिक ताकत व जोमाने काम करण्याचे आशीर्वाद मिळाले आहेत. याबाबत आम्ही सर्व खडकवासला मतदारसंघातील टीमच्या वतीने शहा यांचे आभार मानत आहे.












