न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- मोरे वस्ती येथील ज्ञान बाल विकास शिक्षण संस्था संचलित ज्ञानदा प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढून पर्यावरणाची जनजागृती करण्यात आली. संस्था सचिव लहू कांबळे यांच्या हस्ते तुकाराम महाराज व विठ्ठल रुखमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडीस प्रारंभ झाला.
यावेळी अध्यक्ष गोकुळ गायकवाड, उपाध्यक्ष अंकुश कांबळे, ज्योती कांबळे, नंदा कांबळे, मुख्याध्यापिका निता करपे आदी उपस्थित होते. मोनिका सुतार यांनी वारीचे महत्त्व विषद केले. शिवरकर चौक, मोरे वस्ती, ताम्हाणे वस्ती या परिसरातून दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, निसर्ग हाच गुरू, ग्रंथ हेच गुरु, झाडे लावा झाडे जगवा,सुका कचरा, ओला कचरा वेगळा करा,- घन कचरा व्यवस्थापन ला मदत करा, बेटी बचावो, बेटी पढाओ, स्वच्छता असे जिथे, आरोग्य वसे तिथे, ना गंदगी करेंगे ना करणे देंगे, पाणी अडवा पाणी जिरवा या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.
सूत्रसंचालन शितल शिंदे यांनी तर आभार दिपक जरे यांनी मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली.











