न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- झेप संस्थेच्या विशेष मुलांनी रस्टन कॉलनी येथील दत्त मंदिरात आज गुरुवार (दि. ११) रोजी वारकरी वेशभूषा परिधान करून, भजन व फुगडीचा आनंद घेतला.
चिंचवडगावातील रस्टन कॉलनी, पवनानगर परिसरातील दत्त मंदिर येथे ‘झेप’ या संस्थेची विशेष मुलं वारकरी वेशभूषा परिधान करून आली होती. या सर्व मुलांचे रस्टन कॉलनी मित्रमंडळ तसेच दत्त मंदिर व्यवस्थापन यांच्या तर्फे स्वागत करण्यात आले. तसेच, मुलांनी मंदिरात भजन व फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर मुलांना रस्टन कॉलनी मित्र मंडळ व दत्त मंदिर व्यवस्थापन यांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमास क्षीरसागर काका तसेच शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर, अश्विन मायनाळे, संतोष मेदने, गणेश परदेशी, संतोष मोरजकर आदी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











