न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०१९) :- काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार राहूल गांधी यांच्या बाबत सुब्रमन्ययम स्वामी यांनी वैयक्तिक बदनामीकारक व खोटे वक्तव्य केल्याबाबत आज पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधीका-यांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची पोलिस आयुक्त कार्यालयात भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
सुब्रमन्ययम स्वामी यांनी केलेली वक्तव्ये सामाजिक माध्यामतून प्रसारीत झाली आणि देशभरातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया प्राप्त झाल्या व सर्वत्र याबाबत काँग्रेस कार्यकर्ते ही आंदोलन करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन स्वामी यांच्यावर भारतीय दंडविधान क्रं. ४९९ व ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महाराष्ट्र एन एस यु आय चे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे व पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव आदिचां सहभाग होता.











