न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०१९) :- खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक कला-क्रिडा मंच पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०१९” या पुणे सौंदर्य साम्राज्ञी जिल्हास्तरीय भव्य स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती विजया मानमोडे यांनी दिली. रविवार (दि. २१) रोजी पिंपरीतील आचार्य प्र. के. अत्रे नाट्यगृहात सकाळी ११.३० वाजता ही स्पर्धा आयोजलेली आहे.
मराठमोळी संकल्पना असलेली, मराठी बोली भाषा आणि आपली साहित्य कला वस्त्र संस्कृती संवर्धन व प्रचार प्रसार करणारी राज्यातली ही प्रथम सौंदर्य स्पर्धा मागील वर्षी १८ जिल्ह्यातून यशस्वीपणे राबविली. आता २०१९ हे दुसरे पर्व आहे. ह्या वर्षी एकुन १४ जिल्ह्यात ही स्पर्धा होत आहे व सर्व जिल्हास्तरीय विजेत्यांची ‘महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०१९” ही महाअंतिम प्रतियोगिता सोहळा होईल. ज्यात कुमारी आणि सौभाग्यवती गटातील विजेत्यां महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञींना रु. दोन लाखाचे बक्षिसे विभागून देण्यात येईल.
पुणे जिल्हास्तरीय भव्य प्रतियोगिता निवड फेरी रविवार (दि. १४) रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत हॉटेल क्रिस्टल कोर्ट येथे घेण्यात येत आहे व दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत मुख्य स्पर्धेसाठीची कार्यशाळा आचार्य अत्रे नाट्यगृहात आयोजलेली आहे. तरी आपल्या मराठी महिलांना, सौंदर्य क्षेत्रात ही निर्धास्तपणे सहभाग घेवून आपले कलागुण, कौशल्य दाखविण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ मिळावे. हा हेतु आहे. तरी पुणे जिल्ह्यातील महिला व तरुणी यांनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी होऊन आपल्या मराठी संस्कृतीचा ठसा उमटवावा, असे आवाहन आयोजक व अध्यक्षा विजया सुरेश मानमोडे यांनी केले आहे.
ही स्पर्धा महिला व मुली अशी दोन गटात होणार असून, १७ वर्षांच्या पुढील वयोगट यामधे सहभागी होऊ शकता. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी करिता संपर्क विजया सुरेश मानमोडे ९८२३११३१७७, मृणाल गायकवाड ९००४०६६६८८, डॉ. सारीका सावंत ७०५७२२४४६६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.















