न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०१९) :- पंख संस्था व क्विकहिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या जीवनमूल्य शिक्षण प्रकल्पांतर्गत इयत्ता ९ वीतील विद्यार्थ्यांसाठी स्व:ओळख, ताणतणाव नियोजन, एच.आय.व्ही. एड्स, व्यसनाधीनता, लैंगिक शिक्षण अशा प्रकारचे वेगवेगळे विषयांवरची सत्रे घेतली जातात.
मॉडर्न हायस्कूल मुलांचे, शिवाजीनगर येथे नुकताच हा प्रकल्प राबविण्यात आला. या शाळेत दिनांक ११ जुलै २०१९ रोजी जीवनमूल्य प्रकल्पाचाच एक भाग म्हणून पोलिस कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी पोलीस यांचा थेट संवाद होतो. कार्यक्रमा दरमयान मुलांनी पोलिसांना असंख्य वेगवेगळे प्रश्न विचारले व पोलिसांमार्फत या प्रश्नांना योग्य पद्धतीने उत्तरे देऊन मुलांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यामध्ये छेडछाड, पॉक्सो कायदा, सायबर गुन्हे या विषयांचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी उपस्थित पी. आय. शिंदे व पी. एस. आय जाधव, शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी मुलांशी उत्तम संवाद साधला. या कार्यक्रमासाठी पंख संस्था अध्यक्ष स्मिता आपटे, ट्रस्टी कल्याणी भाबड, मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता लकारे, उपमुख्यध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कुलधरण ही मान्यवर मंडळी उपस्थित होती व पंख टीम तसेच इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंख सोशल वर्कर क्षितिजा शिर्के यांनी तर आभार मॉडर्न हायस्कूलचे शिक्षक निवृत्ति गोपाळे यांनी मानले.











