न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात मजुरांचे बांधकाम साईटवरून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. पोलिसात तक्रार करू नये, याबाबत बांधकाम व्यवसायिकही घाईगडबड करीत, त्या मजुराचा मृतदेह त्याच्या मूळ गावी पाठविण्यासाठी ताबडतोब हालचाली करीत गुन्हा लपविण्याचा प्रकार करताना दिसतात. याबाबत बांधकाम कामगार सेना या संघटनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यां च्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माण येथील टीसीजी गुपच्या बांधकाम साईटवरून ११ व्या मजल्यावरून पडून कामगार नामे एकरामुल अहिरेहमान शेख, वय २८ वर्षे बी. जी. शिर्के कंपनी, बांधकाम साईट फेज ३ येथे ही घटना घडली. कामगारांच्या चुकीमुळे तो पडला. त्याबाबत अजूनही गुन्हा दाखल नाही. आम्ही आपणास विनंती करतो की, कामगार मृत पावला. परंतु, त्याची अवहेलना करू नये. कोणत्याही कामगारांचा नातलग तक्रार करणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे परप्रांतिय कामगार साईटवर मृत्यु पावला तर, त्याचा मृतदेह हॉस्पीटलमधून त्याच्या नातेवाईकासह अॅम्बुलन्समधून त्याचे गावी लवकरात लवकर कसा जाईल, याची तजवीज ठेकेदार व बिल्डर करीत असतो व तुटपुंजी रक्कम देवून त्यांच्या वारसदारांची बोळवण केली जाते. परंतु, संशयाची गोष्ट म्हणजे कामगारांच्या चुकीमुळे कामगार मृत्यु पावला हे कोण ठरवणार?
आम्ही संघटनेच्या वतीने आपणास निवेदन देवून आमची तक्रार घेवून बिल्डरवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. नुकसान भरपाई कायद्यान्वये कोणीही व्यक्ती, कामगार या समजोता करार किंवा कोणतीही नुकसान भरपाई वारसदाराबरोबर रक्कम ठरवू शकत नाही, असे केल्यास वारसदारांवर दबाव आणल्यासारखे होते. फक्त मा. नुकसानभरपाई आयुक्त यांनाच निर्णय देण्याचा अधिकार आहे, असे या निवेदनात बांधकाम कामगार सेनेचे शिंदे यांनी वतीने म्हटले आहे.















