न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी :- निगडी – यमुनानगरमधील सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापनाच्यावतीने सातेरी देवी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थापक विजय परब यांनी दिली.
यमुनानगर येथील सातेरी देवीच्या मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक १० रोजी घटस्थापनेच्या दिवशी या देवीची यथासांग महापूजा करण्यात येणार असून दिनांक २४ रोजीपर्यंत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक १७ रोजी महाप्रसाद व चंडिका होमचे आयोजन करण्यात आले असून कोकण समाजबांधवांनी व परिसरातील भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी देवीच्या भाविकांकरीता भजन, दांडिया, कीर्तन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मा. नगरसेवक बाळासाहेब हिंदळेकर, नगरसेवक राजू मिसाळ, उत्तम केंदळे, सचिन चिखले, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, शीतल सावंत, सुलभा उबाळे, कोकण विकास महासंघाचे कैलास कदम, सुदाम परब, दत्ता पवळे, दीपक भोंडवे, अजय पाताडे, दादा गावडे, बबन दळवी, सचिन काळभोर, दत्ता वाकीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.











