न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०१९) :- ताथवडे गावातील पुणे-मुंबई महामार्गावरील अंडरपासमध्ये पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
जेएसपीएम कॉलेज जवळील पुलाखाली थोडा पाऊस झाला तरी, भरपूर पाणी साचलेले असते. शिवाय या पुलाखाली मोठया प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पाण्यामुळे या खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे या परिसरातील कॉलेज आणि शाळेतील विद्यार्थी, पालक यांना रोज अपघाताला तोंड द्यावे लागत आहे.
दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीला शाळा कॉलेजचे विद्यार्थी, पालक, परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलाचे काम लवकरात लवकर करावे. येत्या दोन दिवसात काम झाले नाही तर, पालक आणि नागरिकांच्या वतीने पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते संदीप पवार यांनी दिला आहे.












