न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०१९) :- फिर्यादी महिला व आरोपी बादशहाची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपी थेट उत्तरप्रदेशहून भोसरीला महिलेच्या घरी आला. नवर्याने सोडल्यानंतर मी तुझ्याबरोबर लग्न करतो, असे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीने दोघांचे अश्लील फोटो हॅलो अॅपवर अपलोड केले. तसेच तिच्या नवर्याच्या मोबाईलवर पाठवून दिले. ही घटना भोसरी येथे नुकतीच घडली. याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बादशहा ऊर्फ रतिन गुप्ता (रा. सतनाम रेल्वे स्टेशन बाजूला, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण तपास करत आहेत.












