न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- यशवंतराव चव्हाण रूग्णालयामधील गलीच्छ प्रकरणामध्ये जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर व मुख्य व्यवस्थापकांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून, त्या रुग्णाला तात्काळ नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य करदात्यांंकरीता तसेच सर्वसामान्य जनतेसाठी सरकारी रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांचा निर्दयपणा व बेजबाबदारपणा वाढत चाललेला आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांची रुग्णालय समिती गठीत करणे गरजेचे आहे.
नुकत्याच घडलेल्या गंभीर प्रकरणातील रुग्ण आनंद अनिवाल याच्यावर चुकीच्या प्रकारे केलेल्या उपचाराचा खर्च व नुकसान भरपाई तात्काळ पाच दिवसांच्या आत देण्यात यावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आपल्या दालनात आंदोलन केले जाईल. याकामी उदभवनाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील, असे या निवेदनात दाखले यांनी म्हटले आहे.












