न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरूणाला वडिलांनी आणि मुलीच्या आत्याने चोप दिल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिंपरी येथे घडली. दरम्यान, चोप दिल्यानंतर तरूणाला थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आल आहे.
लहू धुंड (वय-२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो सातत्याने या मुलीचा पाठलाग करत असे, आजतर मुलीला एकटीला पाहून त्याने तिचा हात हातात घेत मी तुझ्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले. दरम्यान मुलीच्या मागोमाग येत असलेल्या तिच्या वडिलांनी आणि आत्याने हा प्रकार पाहाताच त्याला धरून चोप दिला. लहू हा माझा पाठलाग करत असल्याचे मुलीने वडिलांना काही दिवसापूर्वीच सांगितले होते. याप्रकरणी लहूला पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.












