न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- बोलत थांबलेले दोन तरूण एकमेकांशी भांडत असल्याचा गैरसमज करून तिसऱ्या तरूणाने एकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.
विनेश सुरेश केल्लापण (वय २६, रा, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैबाज सिराज कुरेशी (वय २१, रा. कासारवाडी) अमिन फिरोज खान (वय २०, रा. मोमीन पूरा कॅम्प पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.












