न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पायी घरी जात असताना आठ जणांच्या टोळक्याने महिलेला अडवले. तक्रार मागे घे म्हणून दमदाटी करत मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास आझाद चौक निगडी येथे घडली.
अनिता नवनाथ गायकवाड (वय ५२, रा, अंकुश चौक निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबा क्षीरसागर, राहूल धोत्रे, कैलास विटकर, रुपेश क्षीरसागर, मयुर धोत्रे, शुभम क्षीरसागर, राणी कांबळे, कविता धोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.












