न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीतील सदस्यांचा एका वर्षांचा कार्यकाळ ८ जुलै रोजी संपला आहे. या समितीत सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एक अशा नऊ सदस्यांची येत्या शनिवारी (दि. २०) रोजी होणा-या महासभेत निवड केली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज मागवले आहेत. इच्छुक नगरसेवकांनी बुधवार दि. १७ जुलै रोजी ५ वाजेपर्यंत महापालिकेतील विरोधी पक्षनेता कार्यालयात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले आहे.


















