न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- रावण गैंगच्या अनिकेत जाधव याच्या खुनानंतर रावण गैंग प्रमुख म्हणून ओळखला जाणार ससा म्हणजेच सागर उर्फ दशरथ वाघमोड़े याला पिंपरी चिंचवड़ पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने आपल्या पिंजऱ्यात घेतले आहे.
अत्यंत चपळ असलेल्या या सश्याच्या विरोधात देहूरोड, पिंपरी चिंचवड़, आणि पुणे शहर पोलिस ठाण्यात यापूर्वी ही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर, अनेक वेळा तो जेल चा प्रवास करुनही आला आहे. पोलिस बऱ्याच दिवसापासून त्याला शोधात होते. शेवटी हा ससा आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात या विशेष पथकाच्या हाथी लागला.
विशेष पथकातील पोलिसांनी सश्याची अंगझड़ती घेतली असत त्याच्याकड़े १ देशी बनावटीची पिस्तुल आणि २ राउंड सापडले आहे. या भागात हा ससा या अग्निशस्त्रासह का आला होता याचा तपस पोलिस करत आहेत.












