न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- बिजलीनगर येथील महालक्ष्मी साडी सेंटर नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानातून ३६ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १३) रोजी सकाळी उघडकीस आली.
सीता भाऊसाहेब पाटील (वय ३८, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.