न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी येथील कोकणे चौकाजवळील पुणेकर ज्वेलर्सवर काही दिवसांपूर्वी ५ जणांनी सशस्र दरोडा घातला होता. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दुकानाचे मालक दिव्यांक प्रदीप मेहता (वय २५, रा. आर्य वेदांत रेसिडेन्सी, रहाटणी, पुणे) गंभीर जखमी झाले होते. तर अन्य चारजण फरार होते. फरार असलेल्या चारपैकी एकाचा मुजफ्फरपूर येथे एन्काउंटर करण्यात आला आहे.
रवींद्र उर्फ कालिया गोस्वामी (वय २८, रा. आदमपूर, जि. हिसार) असे एन्काउंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुभाष मोहनलाल बिशनोई (वय 24, रा. मंगाली मोहबत, हरियाणा) आणि महिपाल दुधाराम जाट (वय 21, रा. बालेवाडी, पुणे) अशी अटक केल्याची नावे आहेत. अन्य चौघे फरार होते. त्यांचा पोलीस शोध घेत होते. फरार असलेल्या चारपैकी एकाचा मुजफ्फरपूर येथे एन्काउंटर करण्यात आला.