न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी (मंगळवार दि. १६ जुलै २०१९) :- दिघी येथील छत्रपती शाहू महाराज मनपा प्राथमिक शाळेत आज गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न करण्यात आली. यावेळी पालकसभेचेही आयोजन करण्यात आले होते.
आई हा आपला पहिला गुरु असतो या भावनेतून विद्यार्थिनींनी कृतज्ञ होऊन आपल्या पालकांचे पाद्यपूजा करुन पूजन केले. तसेच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी गुरुंचे जीवनातील स्थान आणि महत्त्व सांगणारे मनोगत व्यक्त केले. सातवीच्या वर्गाने बालसभेचे आयोजन केले होते. समीक्षा बनसोडे या विद्यार्थिनीने अध्यक्षस्थान भूषवले.
नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मणराव उंडे, नगरसेविका निर्मला गायकवाड आणि माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरु हाच जीवनाचा मूलाधार असतो. गुरुशिवाय जीवनात योग्य वाट निर्माण होऊ शकत नाही, अशीच भावना मनोगतातून मान्यवरांनी व्यक्त केली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नंदा वाळके, माजी मुख्याध्यापक नारायण गोडसे हेही उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम लांघी यांनी प्रास्ताविक केले तर वंदना आहेर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.











