न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०१९) :- आयआयबीएम कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गुरुपोर्णिमेनिमित्त शिक्षक वर्ग व सहायक शिक्षक वर्ग यांना पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित आय आय बी एम कॉलेजचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना, विभागप्रमुख मनिश निजामपूरकर, विभागप्रमुख अमोल भागवत, प्राध्यापक गिरीष काटे, प्राध्यापिका डॉ. तेजस्विनी गायकवाड, मुकुल होशिग, पिटरगोंम, अनिकेत यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरवात केली.
डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंटमधील प्रथम वर्ष शिकणार्या विद्यार्थ्यांनी शिक्षक वर्गाचे आशीर्वाद घेतले. दूसर्या व तिसर्या वर्षात शिकणार्या विद्यार्थ्यानी भाषण केली. यावेळी डॉ. धनंजय वर्णेकर सर यांनी विध्यार्थ्याना आई वडील हे आपले पहिले गुरु असे पटवुन दिले व आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असे गुरुपोर्णिमा निमित्त विद्यार्थ्याना संदेश दिला.
संचालक राम रैना यांनी गुरुरब्रम्हा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेशश्र्वरा असे बोलून आपल्या जीवनातील असणारे गुरु या विषयी पटवुन दिले. निटणीटकेपणा व अभ्यासक्रमा बद्दल जागृत केले. तसेच नुकताच जाहीर झालेला हॉटेल मॅनेजमेंटचा निकाल यामध्ये आय आय बी एम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचा निकाल ८४% लागल्याबद्दल सर्व शिक्षक वर्ग यांना डॉ. धनंजय वर्णेकर व राम रैना यांनी शुभेच्छ्या दिल्या. यामध्ये कॉलेजमध्ये प्रथम क्रमाक आलेली विध्यार्थीनी कु. नम्रता भाले हिने ८७.१८% मार्क मिळवून यश मिळवले व दूसरा क्रमांक आलेला विध्यार्थी कु. सर्वेश वायाळ याने ८६.११ % मार्क मिळवून यश मिळवले. तिसरा क्रमांक मिळवलेली विध्यार्थीनी कु. अक्षदा चान्दे हिने ८१. २०% मार्क मिळवून यश मिळवले. यांचा ही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गिरीष काटे व नियोजन डॉ. तेजस्विनी गायकवाड,
अनिकेत वंजारी यांनी केले व आभार प्रदर्शन आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत सर यांनी केले.











