न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत सहाय्यक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, महिला पोलीस हवालदार, पोलीस नाईक, महिला पोलीस नाईक, पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई संवर्गातील एकूण १८१ कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
या बदल्या देहूरोड, एमआयडीसी भोसरी, भोसरी, चाकण, चाकण वाहतूक, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, हिंजवडी, हिंजवडी वाहतूक, आळंदी, दिघी, चिंचवड, वाकड, विशेष शाखा आणि पडताळणी (विशेष शाखा) या कार्यक्षेत्रात करण्यात आल्या आहेत.
नियंत्रण कक्षातील १४३, चाकणमधील ३, सांगवी पोलीस ठाण्यातील १२, देहूरोड पोलीस ठाण्यातील ६, चिंचवड पोलीस ठाण्यातील ४ व एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील १३ कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतच्या आदेशाचे परिपत्रक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी काढले आहे.













