न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी :- लायन्स क्लब ऑफ पुणे, आकुर्डी आणि एक्स्पोनेंशियल उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भोसरीतील महासैनिक औद्योगिक भवनात हे शिबीर संपन्न झाले. यावेळी नेत्र तपासणीत ५०, दंत तपासणी ३५, मधुमेह ९०, रक्तदान शिबिरात ५० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
यावेळी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे उपप्रांतपाल ओम प्रकाश पेठे, रिजन चेअरमन आनंद मुथा, झोन चेअरमन सत्येन भास्कर, अध्यक्ष हिरामण गवई, मेस्कोचे कर्नल (नि) नरेंद्र पाटील, क्लबचे राजेंद्र कोळी, विक्रम माने, विठ्ठल झोडगे, वसंत गुजर, एस त्यागराजन, व्ही.के शर्मा, राजेश शर्मा आदी उपस्थित होते.













