न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्ष रोपण कार्यक्रम धर्मवीर संभाजी उद्यान ज्युबिली गार्डन यमुनानगर येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख उपस्थिती मनसे नगरसेवक सचिन चिखले, Lions Club चे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, बापुशेठ घोलप, क्लबचे अध्यक्ष मोहन पाटील, सेक्रेटरी अनिल दांदडे पाटिल, ट्रेझरर विक्रम माने, झेड सी राजेंद्र कोळी, गवई, सौ श्रध्दा पेठे, सौ सुजाता दांदडे, सौ माने, सौ गवई, गिता शर्मा, त्यागराजन, झोडगे, डाॅ बाहेती,सत्यनभास्कर, व यमुनानगर जेष्ठ नागरिक संघ कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तरुण कार्यकर्ते सुशांत साळवी, आशीष दांदडे व मित्रमंडळ यांनी मेहनत घेतली. या प्रसंगी लायन्स क्लब प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, नगरसेवक सचिन चिखले, डॉ बाहेती आदींनी मार्गदर्शन केले.















