न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १७ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील युवासेना व युवतीसेनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुरुमाऊली पुरस्कार यावेळी उन्नति सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांना देण्यात आला. त्याच बरोबर समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचासुद्धा सन्मान करण्यात आला. त्यात संगीता ठाकूर, प्रिया बिरारी, सोनिया सावंत यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेविका निर्मला कुटे, युवा सेनेचे विश्वजित बारणे, अनिकेत घुले, वैभव थोरात, जितेंद्र ननावरे, शर्वरी जळमकर, प्रतीक्षा घुले, उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, उन्नति सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उर्मिला काळभोर, सुलभा उबाळे, विवेक तितरमारे, सागर बिरारी, प्रिया बिरारी यांच्यासह युवासेना व युवतीसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी चिंचवड विधानसभा युवतीसेनेच्या अध्यक्षा शर्वरी जळमकर यांनी “जे समाजाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन व समाजामध्ये प्रबोधन करत असतात त्यांचा गुरु म्हणून सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून युवतीसेनेने हा पुरस्कार सोहळा गुरु-पौर्णिमेला केला ” असे मत व्यक्त केले.















