न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०१९) :- गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत गतवर्षीच्या तीन महिन्याच्या तुलनेत १४६ कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न मिळविणा-या महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व करसंकलन विभागाच्या प्रमुखांचा व अधिकारी, कर्मचा-यांचा गौरव आज स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
बांधकाम परवानगी विभाग २०६ कोटी रुपये, करआकारणी व करसंकलन विभाग २६९ कोटी ८५ लाख रुपये इतकी उत्पन्नात वाढ झाली असून २३८६ नविन कर आकारणी नोंदी करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी बांधकाम परवानगी विभागाचे शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, शिरीष पोरेडी, राजेंद्र राणे, करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर, मंगेश चितळे, प्रशासन अधिकारी दिलीप आढरी, सहाय्यक मंडल अधिकारी राजेश ठाकर, नंदकिशोर वाघ, श्रीकांत कोळप यांना गौरविण्यात आले.















