न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ७ कोटी १७ लाख रूपये खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.
प्रभाग क्र. ४ बोपखेल रामनगर येथे नविन शौचालय बांधणेकामी येणा-या सुमारे ४१ लाख ५४ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत कारंजे बसविणे व विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ४ कोटी १४ लाख खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
विविध उद्यानात पाणीपुरवठा करणेकामी जुन्या बोअरवेल दुरूस्त करणे व आवश्यकतेनुसार नविन बोअरवेल घेणेबाबत येणा-या सुमारे १४ लाख ९९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड मनपाचे सर्व दवाखाने/रूग्णालये यांना तातडीने आवश्यक औषधे/साहित्य
उपलब्ध होणेकामी येणा-या सुमारे ५० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.२३ मध्ये स्मशान भूमी व घाटाचे नुतनीकरण करण्यासाठी सुमारे १ कोटी ६६ लाख २२ हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या पदव्युत्तर संस्थेसाठी औषध,वैद्यकशास्त्र व शल्य चिकित्सा या विषयाची एकूण ४५१ पुस्तके खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १४ लाख ९९ हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापौर चषक राज्यस्तर रोलबॉल स्पर्धा २०१९-२० आयोजित करणेस व त्याकामी येणा-या सुमारे ६ लाख ९७ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक धोरणानुसार नम्रता सुनिल तायडे हीची जॉर्डन येथे होणा-या तायक्योंदो स्पर्धेत निवड झाल्यामुळे आर्थिक सहाय्य करणेकामी येणा-या सुमारे १ लाख रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपाच्या क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक धोरणानुसार जीवन मुरलीधर लांडगे याची हर्बील चायना येथे होणा-या एशियन बॉडी बिल्डींग स्पर्धेत निवड झाल्यामुळे आर्थिक सहाय्य करणेकामी येणा-या सुमारे १ लाख रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक धोरणानुसार राजेश सुरेश इरले याची हर्बील चायना येथे होणा-या एशियन बॉडी बिल्डींग स्पर्धेत निवड झाल्यामुळे आर्थिक सहाय्य करणेकामी येणा-या सुमारे १ लाख रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली
महापौर चषक राज्यस्तर कॅरम स्पर्धा २०१९-२० (पुरूष,महिला,गट व जेष्ट नागरिक गट) आयोजित करणेस व त्याकामी येणा-या सुमारे ४ लाख ९९ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.















